Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
प्रास्ताविक

   “सहकार” म्हणजे एकत्र येवून बरोबर काम करणे. निकोप व निरोगी समाजरचना ही प्रामणिक व निस्वार्थ तळमळीच्या सहकारी कार्यकर्त्यामधूनच निर्माण होईल. समाजातील विविध घटकांचे एकमेंकांशी बरोबरीच्या नात्याने परस्परांच्या उन्नतीसाठी प्रामणिक सहकार्य ही सहकारातील प्राथमिक आवश्यकता आहे. वास्तविक भारतात सहकाराचा मंत्र नवा नाही. आपल्या प्राचीन श्रृषिमुनींनी “सहकाराने” आम्ही कोणती किमया करू, हे आम्हाला आवर्जुन सांगितले. सहकार व समाज हे दोन अविभाज्य शब्द आहेत. समाजात सहकार नसेल तर समाज स्थितप्रज्ञ राहूच शकणार नाही.

सहकाराची आवश्यकता वास्तविक समाजातील सर्व थरांस असते. पण समाजातील दुर्बल घटकांसाठी त्याची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवते. उदा. एखादा गरीब शेतकर्‍याची आपल्या जमिनीची उत्तम रीतीने मशागत करून त्यात अधिक पीक काढण्याची प्रबळ इच्छा असते. परंतु साधने व भांडवल यांचे अभावी ते करण्यास त्याला अनंत अडचणी येतात. नांगरटीसाठी त्याच्याकडे एकच बैल असतो. दुसरा शेतकरी जो असतो, त्याचेकडेही एकच बैल असतो, त्याचीही आपल्या शेतात चांगले भरपूर उत्पादन काढण्याची तळमळ असते. हे दोन शेतकरी एकमेकास सहकार्य करून एकमेकांचे बैल आपआपल्या शेतीसाठी वापरून आपला कार्यभाग पूर्ण तर करतीलच., परंतु आपले उत्पादन कमी खर्चात सुध्दा निश्चितपणे करतील. कारण दोन बैल प्रत्येक शेतकर्‍याला बारा महिने पोसणे जड जाते, त्याऐवजी एक बैलात प्रत्येकाचे काम भागते. चार - पाच शेतकऱयांना मिळून एक विहीर खणावयाची असते, कोणाकडेही मजुरी देण्यासाठी भांडवल नसते, अशा वेळी ती विहीर शेतकरी व त्याची घरची माणसे श्रम सहकार्याने पुरी करू शकतील. सर्व मिळून ती योग्य खर्चात बांधू शकतील व सर्वजण त्या विहिरीचे पाणी सर्वांच्या शेतीसाठी आळीपाळीने वापरू शकतील.

एकमेकांवर कुरघोडी करून पिळवणुक करण्याच्या इच्छेने कार्य करणार्‍या कोणत्याही व्यक्ती सहकारास अपायकारक ठरतात. सहकारात केवळ भांडवलाचा सहकार करावयाचा नसून श्रम सहकार करण्याचीही आवश्यकता आहे. आणि तेव्हाच तो सहकार यशस्वी होईल.

सहकाराचा व्यवहार तोट्याचा असता कामा नये. कारण एकमेकांच्या भांडवलाच्या श्रमाच्या सहकार्याने कोणताही व्यवहार काटकसरीने झाला पाहिजे, असा सर्वसामान्य सिध्दांत आहे. सहकाराचा व्यवहार तोट्यात होण्याची कारणे सहकारासंबंधी उदासिनता, श्रमचुकार व केवळ स्वतचा स्वार्थ साधण्याच्या प्रवृत्ती ही होय. धन जवळ नसणार्‍या, अपुरे भांडवल असणार्‍या परंतु प्रामणिकपणे श्रम करणाऱयांना सहकाराचा मंत्र हा संजीवनी देणारा मंत्र आहे.

सहकारी संस्था व कंपनी कायद्याने स्थापन झालेल्या संस्था जेव्हा व्यवसाय करतात, तेव्हा दोन्ही संस्थांची उद्दिष्ठे आपण करीत असलेल्या आपल्या व्यवसायात नफा मिळवणे हा असतो.परंतु सहकारी संस्थेचा उद्देश त्याहून काही अधिकचा असतो. सहकारी संस्थां समाजाचे आपल्या नफ्यासाठी शोषण न करण्याच्या वृत्तीने काम करते. तसे तिने केले पाहिजे, तरच सहकारी चळवळ सर्वांची उन्नती करील. सहकारी संस्था ज्या प्रसंगी मध्यस्थाचे काम करीत असते, त्यावेळी उत्पादकास वाजवी भाव मिळवून देणे हेही तिचे कर्तव्य असते. थोडक्यात सेवा बुध्दीने, समाजाचे अहित न होता कार्य करीत राहणे हा सहकाराचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीगत हितसंबंधासाठी दुसर्‍याची पिळवणुक होऊ शकते, सहकारात मात्र हे होवू नये.

 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved